Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

‘ह्या’ कारणामुळे झाला पूजा चव्हाणचा मृत्यू ! शवविच्छेदन अहवालातून समोर आली माहिती…

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- वनमंत्री राठोड यांच्या निकटच्या संपर्कात असलेल्या पूजाचा गेल्या महिन्यात (दि. ८) घराच्या गॅलरीतून उडी मारल्यामुळे मृत्यू झाल्याचे प्राथमिक पोलीस तपासात निष्पन्न झाले. दरम्यान पूजा चव्हाण या तरुणीचा मृत्यू मणक्याला व डोक्याला जबर मार बसल्यानेच झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालावरून मंगळवारी (दि.२) स्पष्ट झाले.

विधानसभेत सध्या गाजत असलेल्या या प्रकरणामुळे वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला आहे. पूजाच्या मृत्यूमुळे राज्यभर खळबळ उडाली. तिचा मृत्यू संशयास्पद असल्याचे आरोप राज्यातील विरोधी पक्षाने केले. वनमंत्री राठोड यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करून यासंदर्भात सखोल चौकशीची व गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रमुख नेत्यांनी केली.

Advertisement

या पार्श्वभूमीवर पूजाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला ? याबाबत शवविच्छेदन अहवाल प्राप्त होणे महत्त्वाचे होते. घटना घडली त्या दिवशी प्राथमिक वैद्यकीय अहवालात जबर जखमी झाल्याने पूजाचा मृत्यू झाल्याचे नमूद केले होते. व्हिसेरा राखून ठेवला होता. गेल्या महिनाभरात तिच्या मृत्यूने वादळ उठले. त्यामुळे, शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल पोलीस तपासासाठी गरजेचा होता.

या प्रकरणाचे पडसाद विधानसभेच्या अधिवेशनात उमटल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी याबाबतच्या सविस्तर अहवालाबाबत माहिती घेतली. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्यासह तज्ज्ञांच्या समितीने पूजा चव्हाणच्या मृत्यूबाबत सविस्तर वैद्यकीय अहवाल मंगळवारी (दि.२) प्रशासनाला सादर केला.

Advertisement

पूजाच्या मणक्याला व डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे तिचा मृत्यू झाला, असे शवविच्छेदन अहवालात नमूद केले आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

Advertisement
li