‘ती’ वाचली मात्र ‘तो’ गेला !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- रस्त्याने जात असताना अचानक एक महिला आडवी आली,या महिलेला वाचविण्याच्या प्रयत्न करताना बुलेटवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात एकजन गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.

ही घटना पारनेर तालुक्यातील भाळवणी शिवारात हॉटेल ऋषिकेश समोर घडली. हनुमंत मुंजाळ (रा.जामगाव) असे या अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, हनुमंत मुंजाळ व नातेवाईक मधुकर बबन मुंजाळ हे दोघे दत्तात्रय लक्ष्मण घोडे यांच्या बुलेटवरुन (क्र.एमएच १६, सीटी ३५३०) जात असताना ते भाळवणी शिवारात हॉटेल ऋषिकेश समोर त्यांना एक महिला अचानक आडवी आली.

महिला आडवी आली असता तिला वाचविण्याच्या प्रयत्न करताना मधुकर मुंजाळ यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातात हनुमंत मुंजाळ जखमी होवून मृत पावले.

या प्रकरणी नरेंद्र हनुमंत मुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पारनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोहवा. कदम हे करत आहेत.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|