Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

धक्कादायक ! नगरसेवकाकडे अडकले भिशीचे तब्बल दोन कोटी रुपये

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- पैसे गुंतवणुकीसाठी सर्वसामान्यांकडून बँकांना प्राधान्य दिले जाते. मात्र महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यात सध्या भिशीचा व्यवसाय हा जोरावर असलेला दिसून येत आहे.

सदाहरित असलेल्या या तालुक्यात भिशीद्वारे कोट्यवधींची उलाढाल होऊ लागली आहे. मात्र याच भिशीच्या व्यवहारामध्ये पैसे अडकल्याने एकाने आत्महत्येचे पाऊल उचलले होते.

Advertisement

यातच शहरातील एका नगरसेवकाकडे भिशीचे चक्क दोन कोटी रुपये अडकले असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. संगमनेर तालुक्यात भिशीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फोफावला आहे.

मोठा आर्थिक फायदा होत असल्याने अनेकजण भिशी चालवित आहेत. शहरातील आजी-माजी नगरसेवकांचाही यात समावेश आहे. दरम्यान शहरातील एका विद्यमान नगरसेवकाची भिशी सध्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.

Advertisement

शहरातील या नगरसेवकाकडे भिशीचे दोन कोटी रुपये अडकले आहेत. त्याने हात वर केल्याने भिशीत सहभागी असणारे त्रस्त झाले आहेत.

या नगरसेवकाच्या हाताखाली काम करणार्‍या भिशीचालकांनीही पैसे देण्यास टाळाटाळ चालविल्याने अनेकांनी त्यांच्याकडे तगादा लावला आहे.

Advertisement

हे पैसे न मिळाल्यास शहरात उद्रेक होण्याची शक्यता आहे. दरम्यान शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी सातत्याने सतर्क असलेली पोलीस यंत्रणेसमोर हा नवीनच पेच उभा राहिला आहे.

भिशीमध्ये पैसे गुंतल्याने कोरोनाच्या या संकटमय काळात अनेकांचे आर्थिक घडी विस्कटली आहे. यामुळे पोलीस व संबंधित खात्याने शहरातील अवैध भिशी व्यवसायाबाबत कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Advertisement

 

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li