Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगर ब्रेकिंग : महिलेवर अत्याचार करणाऱ्या ‘त्या’ तोतया पोलीसास अखेर अटक !

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  बीड जिल्ह्यातील एका तोतया पोलिसाने पोलीस असल्याचे भासवून शिर्डी येथील पीडित महिलेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण केली. पोलीस भरतीत मदत करतो असे सांगून तोतया पोलीसाने तिच्याशी शारीरीक संबध ठेवत लग्न करतो असे सांगीतले.

मारहाण करत तिची फसवणूक केल्या प्रकरणी तोतया पोलीसाविरोधात राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. बीड येथील हिवराफाडी येथील किरण महादेव शिंदे याने शिर्डी येथील महीलेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख होवून मैत्री केली.

Advertisement

तसेच पोलीस असल्याचे बनावट आयकार्ड व फोटो दाखवत शिर्डी पोलीस ठाण्यात नोकरीस असल्याचे भासवून तिच्याशी ओळख वाढविली. तुला पोलीस भरतीत मदत करतो, तु नवऱ्याला सोडून, दे माझ्याशी लग्न कर असे सांगून तिच्याशी शारीरीक संबध ठेवले. नंतर तो तोतया पोलीस असल्याचा फिर्यादीला संशय आल्याने तिने त्यास विचारणा केली असता महिलेस लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

त्यानंतर राहाता पोलीसात महिलेने फिर्याद दिली. तिची फिर्याद नोंदवून घेत पोलीसांनी सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्याची झाड झडती घेतली असता त्याच्याकडे बनावट पोलीसाचे आयकार्ड, पोलीस ड्रेस व फोटो सापडले. या प्रकरणी तोतया पोलीसाच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

Advertisement
  • किंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

li