Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

पोलिस पाटलांना आता इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार ‘ही’ सुविधा !

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- पोलिस पाटील हा सरकारचा शेवटचा प्रतिनिधी म्हणून गावपातळीवर कार्यरत असतो. गावातील कायदा व सुव्यवस्था राखणे ही महत्त्वाची जबाबदारी पोलिस पाटलांवर असते.

दरम्यान पोलिस पाटलांना आता इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच कलम ३५३चे संरक्षण मिळणार आहे. कर्तव्य बजावत असताना पोलिस पाटलांना मारहाण झाल्यास

Advertisement

आता सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा संबंधित आरोपींविरूदध दाखल केला जाणार आहे, राज्याच्या पोलिस महासंचालकांनी यासंबंधीच्या सूचना सर्व पोलिस ठाण्यांना दिल्या आहेत.p[

राज्यातील पोलिस पाटलांची ही जुनीच मागणी होती. जून २०१८ मध्ये कलम ३५३ मध्ये सुधारणा करण्यात आल्या. त्या पोलिस पाटलांनाही लागू करण्याची मागणी होती.

Advertisement

यासंबंधी डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. आता त्या आधारे पोलिस महासंचालकांनी सर्व पोलिस ठाण्यांना आदेश दिला आहे.

पोलिस पाटील हा सरकारचा शेवटचा प्रतिनिधी म्हणून गावपातळीवर कार्यरत असतो. गावातील कायदा व सुव्यवस्था राखणे ही महत्त्वाची जबाबदारी पोलिस पाटलांवर असते.

Advertisement

अशा परिस्थितीत कर्तव्य बजावत असताना पोलिस पाटील यांना मारहाण झाल्याच्या घटना घडतात. अशावेळी दोषींविरुध्द कडक कायदेशिर कारवाई करणे जरुरी आहे.

त्यामुळे यापुढे पोलिस पाटलांना मारहाणीच्या घटना घडल्यास आरोपींविरूद्ध कलम ३५३ प्रमाणे अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

li