Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

कोरोनाचा धोका वाढला; राजधानीत पोहचला नवा स्ट्रेन

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-मुंबईमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला आहे. आतापर्यंत ब्रिटनसह इतर देशांमध्ये हा नवा स्ट्रेन पसरल्याची माहिती समोर येत होती.

पण आता मुंबईत हा नवीन स्ट्रेन दाखल झाल्यामुळे लोकांच्या चिंतेत भर पडली आहे. मुंबईमध्ये युकेचा नवा कोरोना स्ट्रेन आढळला असून आतापर्यंत ही रुग्णसंख्या ४ वर पोहोचली आहे.

Advertisement

९० नमुन्यांपैकी एका व्यक्तीच्या अहवालात हा स्ट्रेन सापडला आहे. जिनोम सिक्वेन्सिंगनंतर एका रुग्णामध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला. मुंबईत आतापर्यंत यूके स्ट्रेनच्या ४ केसेस झाल्या आहेत.

दिल्लीच्या प्रयोग शाळेत जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आलेल्या ९० पैकी एका सँपलमध्ये ब्रिटनमधील कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे.

Advertisement

अद्याप संपूर्ण अहवाल येणं बाकी आहे. याआधीच आढळून आलेल्या कोरोना रुग्णांवर मुंबईत अंधेरीच्या सेवन हिल्स रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात होते.

ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या स्ट्रेननं आतापर्यंत ५० देशांमध्ये हल्ला केला आहे. देशात १८७ केसेस सापडल्या आहेत. तर त्यापैकी १३ रुग्ण महाराष्ट्रात सापडल्याचे दिसून आलं आहे.

Advertisement

जाणून घ्या राज्यातील कोरोनाची परिस्थिती महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ९ हजार ८५५ कोरोना रुग्ण समोर आले असून यामुळे राज्यभरात खळबळ निर्माण झाली आहे.

यामध्ये ४२ लोकांना मृत्यू सामना करावा लागला आहे. सध्या राज्यात मृत्यूदर हा २.४० टक्के आहे. राज्यात ६ हजार ५५९ कोरोना रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.

Advertisement

यामुळे कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा रिकव्हरी रेट ९३.७७ आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाच्या केसेसमध्ये ८२ हजार ३४३ एक्टिव्ह रुग्ण आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

Advertisement
li