Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

लिप्ट देऊन लावला दहा हजारांना चुना!

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:-आपण दुचाकीवर रस्त्याने जात असताना एखाद्याने जर हात दाखवल्यास आपण थांबुन ठराविक अंतरापर्यंत त्या व्यक्तीला माणुसकीच्या नात्याने लिफ्ट देतो.

मात्र आजकाल अशी लिफ्ट घेणे देखील चांगलेच महागात पडू शकते. अशीच घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे. पुणे जिल्ह्यातील एकाने लिफ्ट दिली, मात्र जाताना संबंधिताला १० हजारांना चुना लावून गेला.

Advertisement

याबाबत सविस्तर असे की, पूणे जिल्ह्यातील दावडी (ताख़ेड) येथील रहिवासी बबलू गुलाबभाई शेख यांचा लग्न जमविण्याचा व्यवसाय असून,ते काही कामानिमित्त श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे आले होते.

दरम्यान लोणी व्यंकनाथ येथील रेल्वे पुलापर्यंत एका मोटारसायकलस्वाराने लिफ्ट दिली. शेख हे या पुलाजवळ उतरले असता या मोटारसायकलस्वाराने त्यांची रोख रक्कम,

Advertisement

मोबाईल व इतर महत्वाचे कागदपत्र असलेली कापडी पिशवी घेवून पोबारा केला. याप्रकरणी शेख यांनी श्रीगोंदा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात मोटरसायकल चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

Advertisement
li