राज्यातील ‘या’ महत्त्वाच्या प्रश्नावर सोमवारी ऑनलाइन सुनावणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:-राज्यातील सर्वात महत्त्वाच्या आिण बहुचर्चित अशा मराठा आरक्षणावर असलेल्या सोमवारी (८ मार्च) ऑनलाईन पद्धतीने सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

या सुनावणी संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षणप्रकरणी ५ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार होती. मात्र ती सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती.

आता उद्या आरक्षणाप्रकरणी सुनावणी होणार आहे. ८ मार्च १० ते मार्च दरम्यान विरोधक आपली बाजू मांडतील तर १२ ते १७ मार्च दरम्यान राज्य सरकार आपली बाजू सुप्रीम कोर्टात मांडेल, अशी माहिती आहे.

कोविड संसर्गामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी पार पडत आहे. मात्र व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी न घेता प्रत्यक्ष सुनावणी घ्यावी, अशी मागणी मराठा संघटना करत आहे.

असं असलं तरी ८ मार्चची सुनावणी मात्र ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. विरोधक प्रत्येकवेळी मराठा आरक्षणावर सरकार गंभीर नाही,

असा आरोप करत आहेत. अशा वेळी मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवण्यासाठी महाराष्ट्र सरकारची कितपत तयारी झाली, हा यानिमित्ताने प्रश्न आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर