Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

कृषीपंप थकबाकीपोटी १ लाख शेतकऱ्यांनी केला ७० कोटींचा भरणा!

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:-ऊर्जा विभागाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० ची अंमलबजावणी अहमदनगर मंडळात गतीने सुरु असून,यामध्ये अहमदनगर मंडळात एकूण २ हजार ३९ कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या आहेत.

यामध्ये लघुदाब वाहिनीच्या वीजखांबापासून ३० मीटरच्या आत असलेल्या १ हजार ७७४ जोडण्यांचा समावेश आहे. तर या योजनेअंतर्गत अहमदनगर मंडळात १ लाख १० हजार ९३० शेतकऱ्यांनी कृषीपंप थकबाकीपोटी ७० कोटी रुपयांचा भरणा करून योजनेचा लाभ घेतला आहे.

Advertisement

कृषिपंप वीजजोडणी धोरणानुसार लघुदाब वीजवाहिनीच्या खांबापासून ३० मीटरच्या आत असलेल्या कृषिपंपांना परिसरातील नजिकच्या रोहित्राची क्षमता पर्याप्त असल्यास नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहेत.

यासोबतच ज्या कृषिपंपांद्वारे अनधिकृत वीजवापर सुरु आहे त्यांनाही नवीन वीजजोडण्या देण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी रोहित्रांची क्षमता पर्याप्त नाही त्या रोहित्रांची क्षमतावाढ करण्यात येणार आहे.

Advertisement

लघुदाब वीजवाहिनीच्या खांबापासून ३० मीटरच्या आत अंतर असलेल्या अहमदनगर मंडळामध्ये १७७४ वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.

तर इतर योजनेतून सुद्धा जिल्ह्यात कृषिपंपांच्या ९५० जोडण्या या कालावधीत देण्यात आल्या आहेत. नवीन कृषीपंप वीज धोरणास शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.

Advertisement

ऑक्टोबर २० मध्ये जाहीर झालेल्या या योजनेत थकबाकी भरण्यासाठी विविध सवलती जाहीर झाल्यापासून अहमदनगर मंडलात १ लाख १० हजार ९३० शेतकऱ्यांनी थकबाकीपोटी ७० कोटी ७लाख रुपयांचा याप्रमाणे भरणा करून या योजनेचा लाभ घेतला आहे.

या योजनेचा लाभ मंडळातील सर्वच शेतकरी बंधूनी घेण्याचे आवाहन नाशिक परिमंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी केले आहे.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

li