Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

आगामी 4 दिवसात राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:-प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने राज्यातील अवकाळी पाऊस सुरू झालेल्या भागांची माहिती प्रसिद्ध केली आहे. येत्या काही तासांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये पावसाची हजेरी लागेल असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

पुणे, नंदुरबार, अहमदनगर, जुन्नर तसेच सातारा परिसरात पावसाची हजेरी लागली असल्याची माहिती आहे. ही हजेरी मोठी नसली तरीही या अवकाळी पावसाचा परिणाम हा शेतीवर होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Advertisement

राज्यात धुळे, जळगाव यासारख्या भागातही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. शेतकऱ्यांसाठी आगामी पाच दिवसांचा अलर्ट हवामान विभागाकडून याआधीच वर्तवण्यात आला होता.

त्यामुळेच शेतकऱ्यांना आपल्या पिकांची काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले होते. हवामान खात्याकडून विदर्भ मराठवाडा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Advertisement

या भागांमध्ये दिवसा ढगाळ वातावरण असल्यामुळे आद्रतेचे प्रमाण वाढले असल्यामुळे उन्हाचा पार घसरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंताही वाढली आहे.

तसेच मागिल तीन-चार दिवसांत पासून मध्य प्रदेशातील विशेषत: पूर्व मध्य प्रदेशात अवकाळी पावसाला अनुकूल स्वरुपाचे वातावरण झालं असल्याचं पाहायला मिळत आहे.

Advertisement

चंद्रपूर शहरात पावसाच्या हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. अचानक कोसळलेल्या पावसामुळे काही काळसाठी वाहतूक कोंडी झाली होती.

इतकच नाहीतर पुढील तासभरात शहर जिल्ह्यात आणखी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर पाहायला मिळाला.

Advertisement

काही गावांत झालेल्या गारपीटामुळे गहू, कांदा, संत्री, हरभरा या पिकांचं चांगलंच नुकसान झालं आहे. त्यामुळे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं देखील खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले पाहायला मिळत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

Advertisement
li