This Website Is Part Of TBS Media Group
अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:-शहराला पाणी पुरवठा करणार्या वसंत टेकडी येथील पाणी साठवण टाकीची लेव्हल घटल्याने शहराच्या मध्यवर्ती भागात पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे.
पाणी पुरवठा तातडीने सुधारणा करा अन्यथा आंदोलनाचा इशारा नगरसेवकांनी दिला आहे. पाणी प्रशांवरून आज नगरसेविका सुप्रिया जाधव आणि माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी आयुक्तांना पत्र देत पाणी पुरवठ्याविषयी तक्रार केली आहे.
मुळा डॅमवरून पाणी उपसा करणार्या मोटारी त्याच. लाईनही तीच मग आज अचानक पाण्याची लेव्हल कमी कशी झाली, याचा शोध घेण्यासाठी सोमवारी आयुक्तांसमवेत पहाणी करणार आहे.
शहराला पूर्ण दाबाने भरपूर पाणी मिळावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सभापती घुले यांनी सांगितले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची टंचाई जाणवत आहे.
कमी दाबामुळे पाणी पुरवठा होत असल्याने पाणीच मिळत नसल्याच्या तक्रारी वार्डातील लोकांनी केल्या आहेत. आता पाण्यासाठी आंदोलन हाती घ्यावी लागेल, त्याशिवाय पर्याय नाही.
शहरातील या भागात कामी दाबाने पाणी पुरवठा :- चितळे रोड, कोर्ट गल्ली, नालेगाव, चौपाटी कारंजा, मानकर गल्ली, तोफखाना, दिल्लीगेट, सिव्हील हडको, सिध्दीबाग,
बागडपट्टी, सातभाई मळा, बालिकाश्रम रोड, गौतम नगर, निलक्रांती चौक, ढोर वस्ती व बडोदा बँक कॉलनी परिसरात अत्यंत कमी दाबाने पिण्याचा पाण्याचा पुरवठा होत आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|