Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने प्रवास होतोय सुरु

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:- करोना महामारी वेगाने फैलावत आहे. नागरीकांनी नियमांचे उल्लंघन केल्याने तालुका पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोपरगाव शहरासह १ तालुक्यात १९ मार्च रोजी सापडलेल्या ५७ करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली

Advertisement

त्यात १३ तर खासगी लॅब मधील १८ तर नगर येथे पाठवलेल्या अहवालांपैकी ११ असे ऐकून ४२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून आज अहमदनगर येथे १२३ व्यक्तींचे श्राव पाठविण्यात आले असल्याची

माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे. कोपरगाव तालुक्यात आज २० मार्च पर्यंत तीन हजार ६८१ रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून तीन हजार 263 रुग्ण बरे झाले आहे.

Advertisement

आज पर्यंत २२ हजार ८२७ लोकांची करोना चाचणी करण्यात आली. अतापर्यंत 49 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात करोनाची रुग्णसंख्या वाढत आहे.

त्यामुळे कोपरगाव शहरातील जनतेने करोनाचे सर्व नियम पाळून मास्क वापरा, सोशल डिस्टन्स ठेवा, सॅनिटायझरचा वापर कायम करा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

li