Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

गृहमंत्री अनिल देशमुखांनी राजीनामा द्यावा

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:- गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे आरोपानंतर व सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर देशमुख यांचा राजीनामा घेऊन चौकशी करण्यासाठी भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले.

पाथर्डी आमदार मोनिका राजळे यांचे मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा व या प्रकरणाची निष्पक्ष चौकशीचे मागणी निवेदन देण्यात आले.

Advertisement

पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण म्हणाले, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलिस अिधकारी सचिन वाझे

यांना मुंबईमधील बार व इतर ठिकाणाहून महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते. असे पत्र त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिले आहे. या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आह.

Advertisement

त्यासाठी गृहमंत्री देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आम्ही करत आहोत. पोलिस दलातील उच्च अधिकारी अशा प्रकारचे आरोप व पत्र लिहीत असतील तर या राज्यांमध्ये नेमकं चाललय काय याचीही माहिती जनतेसमोर आली पाहिजे, अशी मागणीही भाजपच्या वतीने करण्यात आली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

Advertisement
li