This Website Is Part Of TBS Media Group
अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:-मनसुख हिरेन प्रकरण असो किंवा गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरण याची निष्पक्ष चौकशी राज्य सरकारकडून होणार नाही. त्यासाठी हे सरकार बरखास्त करण्यात यावे.
मात्र सभागृह बरखास्त करू नये, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी दुपारी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
कोट्यवधी रुपये वसुलीचा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आला. आरोप करणारे माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर आहेत.
कोट्यवधी रुपये वसूल करण्याचा निर्णय पक्ष स्तरावर घेण्यात आला आहे की कॅबिनेट स्तरावर याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे”, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
त्यासाठी हे सरकार बरखास्त करण्यात यावे, याबाबत राज्यपालांनी आपला अहवाल पाठवावा अन्यथा आम्ही असे समजू की राज्यपाल ज्या पक्षाचे आहेत त्यांचेही लोक यामध्ये सामील आहेत, असा इशारा त्यांनी दिला.
वाझे वसुली प्रकरणात देशमुख एकटे दोषी आहेत का या प्रकरणात कॅबिनेट गुंतली आहे? हे ज्या दिवशी ते मान्य करतील तेव्हा मोठा बॉम्बस्फोट होईल हे आपल्याला माहीत असल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
“तू माझी पाठ खाजवू नको मी तुझी पाठ खाजवणार नाही अशी भूमिका सध्या सत्ताधारी विरोधक घेत आहेत. त्यासाठी वाझे यांचा जबाब सार्वजनिक झाल्यास सर्व प्रकरण बाहेर येईल आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल”, असा दावा त्यांनी केला.
परमबीर यांच्या पत्रावरून हे निश्चित झाले आहे की राजकारणातील क्रिमिनल एलिमेंट व पोलीस खात्यातील क्रिमिनल एलिमेंट एकत्र आल्यावर काय घडू शकते.
त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणाच्या प्रमुखांनी सचिन वाझे यांचा जबाब सार्वजनिक करावा, त्यामुळे राजकारणात गुन्हेगार किती झाले आहे याची माहिती लोकांना मिळेल व ते योग्य निर्णय घेतील.
हे वसुलीचे राज्य असून ही वसुली थांबली नाही तर खालच्या स्तरावर ही वसुली चालू होईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. या सर्व प्रकरणात भाजपा बोटचेपी भूमिका का घेत आहे हा मुद्दा ही त्यांनी यावेळी मांडला.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|