This Website Is Part Of TBS Media Group
अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- राहुरी तालुक्यातील कोरोना रुग्णांनी आज अर्धशतक पार केले. तालुक्यात काल ५५ रुग्ण आढळले आहेत.
रोज शहरात पोलीस, नगरपालिका, प्रशासन एकत्र फिरून मास्क वापरण्याबात व सोशल डिस्टन्स ठेवण्याबाबत जनजागृती करीत आहेत.
नियमांचे पालन न करणाऱ्यांकडून दंडही वसूल केला जात आहे. असे असले तरी नागरिक नियमांकडे दुर्लक्ष करीत आहेत. मागील गुरुवारी आठवडे बाजारच्या दिवशी पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे स्वत: बाजारात फिरत होते,
तसेच नगरपालिकेच्या वतीने राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या आदेशावरून नगरसेवक मास्कचे वाटप करीत होते. रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे : राहुरी शहर २०, वांबोरी १५,
खडांबे खुर्द ४, देवळाली प्रवरा २, राहुरी फॅक्टरी २, सोनगाव २, तांदुळवाडी २, उंबरे १, बारागांव नांदुर १, टाकळीमियॉ १, धानोरे १, विदयापीठ १, वळण १, वांजुळपोई १, कात्रड १.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|