Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

व्यापारी हत्याकांड प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यातील व्यपाऱ्याच्या हत्याकांडाने काही दिवसांपूर्वी नगर जिल्हा चांगलाच ढवळून निघाला होता. याच प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक देखील केली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींना काल न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधीश श्रीमती रॉय यांनी दिले आहेत. बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण

Advertisement

यांचे अपहरण करून त्यांची हत्या करून त्यांचा मृतदेह आठ दिवसानंतर वाकडी रोडवरील यशवंतबाबा रेल्वे चौकीच्या परिसरात फेकून दिला होता.

त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करत अगोदर श्रीरामपूर तालुक्यातील दोघा आरोपींना अटक केली होती. त्यांना तीन दिवस दोनवेळेस पोलीस कोठडी देत त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Advertisement

दरम्यान पोलिसांनी नाशिक येथून सिन्नरच्या पाच आरोपींंना अटक केली होती. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन, मोबाईल जप्त केले होते. त्यांना न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडी दिली होती.

त्यानंतर पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर तीन दिवस पोलीस कोठडी वाढविण्यात आली होती. काल पुन्हा या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी 15 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत केली.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

li