Breaking News Updates Of Ahmednagar

चिंता वाढली ; गुंतवणूकदारांचे 3.25 लाख कोटी बुडाले

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-भारतीय शेअर बाजारात आज मोठी पडझड पहायला मिळाली. आज दिवसभरातील व्यापारानंतर बीएसई सेन्सेक्स 871 अंकांनी घसरून 49180 च्या पातळीवर बंद झाला.

या व्यतिरिक्त निफ्टी निर्देशांक 265 अंक घसरून 14549 च्या पातळीवर आला आहे. आजच्या विक्रीनंतर गुंतवणूकदारांचे 3.25 लाख कोटी रुपयांचे बुडाले आहेत.

Advertisement

शेअर्स आज लाल चिन्हात बंद :- सेन्सेक्सच्या टॉप 30 मध्ये केवळ 2 शेअर्स तेजीसह बंद झाले, तर 28 शेअर्स आज लाल चिन्हात बंद झाले. एशियन पेंट्स आणि पॉवरग्रीडच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली.

बाजारात या शेअर्सची पडझड :- बाजाराला आज ज्या शेअर्सने उतरवलं ते म्हणजे, रिलायन्स इंडस्ट्रीज, ICICI बँक, HDFC बँक, आणि इन्फोससिस होय. दिवसभरातील ट्रेडिंगमध्ये बाजार एकदाही 50 हजाराच्या वर गेलेला नाही.

Advertisement

निफ्टीमध्ये या शेअर्सची पडझड :- टाटा स्टील, टाटा मोटार्स, अदानी पोर्ट्स, हिंदाल्को, महिंद्रा अँड महिंद्रा, युपीएल, एसबीआय, इंडसइंड बँक, एनटीपीसी आदी

निफ्टीत वाढ झालेले शेअर्स :- सिप्ला, एशियन पेंट्स, पावरग्रिड

Advertisement

ऑटो शेअर्समध्ये पडझड :- मदरसन सूमी, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, एक्साइड एमआरएफ, भारत फोर्ज, बॉश, आयशर, मोटार्स, अमारा राजा बॅटरी, मारूती, बजाज ऑटो…

जर्मनी, फ्रान्स, इटली आणि ब्राझीलसारख्या देशांमध्ये कोरोनाचा तिसरा प्रकार समोर आलाय. त्यातही कोरोनाची वाढती प्रकरणे आहेत. त्याचा परिणाम युरोपच्या बाजारपेठांमध्ये दिसून येतो.

Advertisement

युरोपियन बाजारामध्येही दबाव दिसून येत आहे. भारतात पुन्हा कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. दररोज जवळपास 50 हजार नवीन प्रकरणे समोर येत आहेत. यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कमी झाला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

Advertisement
Advertisement
li