Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

राज्यातील १२ धोकादायक धरणांत जायकवाडी व भंडारदराचा समावेश

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- राज्यातील १२ धोकादायक धरणांत जायकवाडी व भंडारदराचा समावेश करण्यात आला आहे.

केंद्रीय जल आयोगाकडून शिफारस करण्यात आलेल्या धोकादायक धरणांस जागतिक बँक व राज्य शासनाचे सहाय्याने धरण पुनरस्थापना व सुधारणा प्रकल्पातून टप्पा-२ (ड्रीप -२) अंतर्गत मजबुतीकरण करण्यात येणार आहे.

Advertisement

नुकतेच महाराष्ट्रातील प्रमुख ३० जलप्रकल्पांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यात मराठवाड्यातील जायकवाडी व नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाचा समावेश आहे.

धरणाच्या मजबुतीकरण व तंदुरुस्तीसाठी जागतिक बँक व केंद्र सरकारच्या सहाय्याने जायकवाडी धरणास ८८ कोटी ५७ लाख व भंडारदरा धरणास ७३ कोटी ७९ लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली.

Advertisement

याशिवाय राज्यातील अन्य १० धोकादायक धरणांनाही आर्थिक मदत देण्यात आली. १२ धरणांकरिता एकूण ६०० कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.

भंडारदारा धरणाच्या निर्मितीनंतर १९७३ साली धरणाच्या भिंतीस सपोर्ट देण्यात आल्यानंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मिळणार आहे. या निधीतून भंडारदरा धरणाचे आरोग्य सुधारण्यास निश्चित मदत होणार आहे.

Advertisement

या मंजूर निधीतून पहिल्या टप्प्यात १५ कोटी रुपयांचा पहिला हप्ता देण्यात येत असून त्यातून लवकरच धरणाच्या मजबुतीकरणाच्या कामास सुरुवात करण्यात येत असल्याची माहिती नगर जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जी. बी. नान्नोर यांनी दिली.

अमृतवाहिनी तथा प्रवरा नदीवर १९१० ते १९२६ या कालावधीत भंडारदरा येथे दगडी बांधकामात हे धरण तयार करण्यात आले. २०२१ मध्ये या धरणास ९५ वर्षे पूर्ण होत आहेत.

Advertisement

या धरणास १९६९ मध्ये भूकंपामुळे तडे गेल्याचे धोका निर्माण होऊ शकेल म्हणून १९६९ ते ७३ या कालावधित भिंतीजवळ सपोर्ट देण्यात आल्यानंतर मजबुतीकरण करण्यात आले. यानंतर या धरणावर १९७३ नंतर कोणतेच मोठे काम करण्यात आलेले नाही.

मात्र, आता नव्यानेच केंद्रीय जलआयोग व जागतिक बँकेच्या सहाय्याने धरण पुनर्स्थापना व सुधारणा प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत महाराष्ट्रातील ३० प्रकल्पांमध्ये भंडारदरा धरणाचा समावेश केला. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने धरण सुरक्षा पुनर्विलोकन समितीची (डीएसआरपी) स्थापना केली.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

li