Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

कोरोना प्रतिबंधक योजनेत श्रीरामपूर नापास ! तालुक्याचा मृत्यू दर जिल्हा व राज्याच्या दुप्पट …

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-  कोरोनाच्या बाबतीत श्रीरामपूर तालुका जिल्ह्यात हा कोरोनाचा हॉटस्पॉट होत असून श्रीरामपूर तालुक्याचा मृत्यू दर जिल्हा व राज्याच्या दुप्पट असून जर काळजी घेतली नाही, तर परिस्थिती आवाक्याबाहेर जाईल.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करावी, थेट संपर्कात आलेल्या लोकांच्या कोरोना चाचण्या कराव्यात. जर ते येत नसतील, तर त्यांना उचलून आणून चाचण्या कराव्यात. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुढील दोन महिने सतर्क रहावे लागेल.

Advertisement

श्रीरामपुरात आरोग्य, पोलिस व प्रशासकीय यंत्रणेमध्ये योग्य समनव्य नसल्याने कोरोना प्रतिबंधक योजनेत श्रीरामपूर नापास झाले असून योग्य काम न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे.श्रीरामपूर येथील प्रशासकीय इमारतीत मंगळवारी आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते.

मुख्य कार्यकारी क्षीरसागर यांनी श्रीरामपूर तालुका जिल्ह्यात हॉटस्पॉट होऊ पाहत आहे. लग्नासाठी ५० लोकांची अट असल्याने लोक आता कार्यालयाऐवजी वाड्या, वस्त्यांवर हजारोंच्या संख्येत लग्न करीत आहेत.

Advertisement

त्यासाठी गावोगावच्या समित्या कार्यरत कराव्यात. विवाह सोहळे, अंत्यविधी, दशक्रिया विधी व इतर कार्यक्रमांवर पोलीस व स्थानिक सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांनी समक्ष जाऊन चित्रिकरण करावे व नियम पाळले जात नसल्यास गुन्हे दाखल करा, असे आदेश दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर,

जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संदीप सांगळे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश शिंदे, पोलिस निरीक्षक संजय सानप, तालुका पोलिस निरीक्षक मधुकर साळवे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे,

Advertisement

तालुका आरोग्याधिकारी डॉ. मोहन शिंदे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. योगेश बंड, एसटीचे आगारप्रमुख राकेश शिवदे, डॉ. सचिन पऱ्हे, डॉ. देविदास चोखर आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर यांनी आरोग्य विभाग, महसूल, पोलिस, नगरपालिका, पंचायत समिती आदी विभागांकडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

Advertisement
li