Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

कॅशिअरनेच चोरली बँकेतील चार लाखांची रोकड

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत नोकरीस असलेल्या कॅशिअरने बँकेतील चार लाखांची रोकड बँकेच्या तिजोरीत न ठेवता स्वतःच्या खिशात घालून चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

दरम्यान हा खळबळजनक प्रकार कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख शाखेत १२ मार्च रोजी घडली असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत संबंधित कॅशिअर वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

हा प्रकार बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून, ही चोरी कॅशिअरनेच केली असल्याची खात्री पटल्यानंतर बँकेचे कर्मचारी जितेंद्र माधव मोरे (वय ३८, रा. द्वारकानगरी, कोपरगाव) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

या फिर्यादीवरून कॅशिअर बाळासाहेब नाथा पवार (रा. चासनळी, ता. कोपरगाव) याच्याविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आरोपी फरार झाला असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अमरनाथ गवसने करीत आहेत.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

li