Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

आजपासून खुला झालेला आहे हा धमाकेदार आयपीओ

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-रेस्टॉरंट साखळी असलेल्या बार्बिक्यू नेशन (Barbeque Nation IPO) चा आयपीओ 26 मार्चपर्यंत सबस्क्राईब करता येणार आहे.

दरम्यान आयपीओ (IPO) मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हि एक चांगली संधी चालून आली आहे. कंपनीला या आयपीओच्या माध्यमांतून 180 कोटी रुपये उभे करायचे आहेत.

Advertisement

बार्बिक्यू नेशनच्या आयपीओची प्राईस बँड 498-500 रुपये आहे. तर आयपीओची लॉटसाईज 30 इतकी आहे. एका लॉटसाठी साधारण 15000 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.

बार्बिक्यू नेशन काय आहे.? बार्बिक्यू नेशनची स्थापना 2006 साली झाली. कंपनीने आपले पहिले रेस्टॉरंट 2008 साली सुरू केले.

Advertisement

सध्या भारतात 138, मलेशियात 1, युएई 5, ओमान 1 शाखा कार्यरत आहेत. आर्थिक वर्ष 2020 मध्ये कंपनीची उलाढाल 850 कोटी इतकी होती.

बार्बिक्यू नेशनच्या आयपीओतील विशेष बाब म्हणजे या कंपनीत दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या एल्केम कॅपिटल आणि खासगी इक्विटी फर्म सीएक्सची गुंतवणूक आहे.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

li