Breaking News Updates Of Ahmednagar

निवडणुकीत ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेटपेपर वापरण्याचे ग्रामपंचायतींना ठराव घेण्याचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- ईव्हीएम मशीन हटवून लोकशाही वाचविण्यासाठी इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम मशीन आंदोलनाच्या वतीने जालिंदर चोभे मास्तर यांनी जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केले.

तर ग्रामपंचायतीने निवडणुकीत ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेटपेपर वापरण्याचे ठराव घेण्याचे आवाहन करुन, त्यांनी नागरिकांना ईव्हीएम मशीन विरोधी पत्रके वाटली. ईव्हीएम मशीन भारतीय राज्यघटना आणि लोकतंत्राच्या विरोधातील पाऊल असून, यामुळे देशात हुकूमशाहीचे प्रस्थ वाढत आहे.

Advertisement

निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा दुरुपयोग झाल्याचे अनेक तक्रारी आल्या आहेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने देखील 2013 साली यावर शिक्कामोर्तब केला होता. तरीही 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन वापरण्यात आले.

त्यानंतर झालेल्या विविध राज्यातील निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनवर प्रश्‍न उपस्थित करण्यात आले. ईव्हीएम मशीनद्वारे उमेदवारांच्या मतांची अदलाबदल होत असल्याचा आरोप करुन इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम मशीन आंदोलनाच्या वतीने अनेकवेळा धरणे आंदोलन, उपोषण करून नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

Advertisement

अद्ययावत तंत्रज्ञानामुळे ईव्हीएम मशीनमध्ये अपहार होऊन मतांची हेराफेरी होऊ शकते. ईव्हीएम मशीन मधील मायक्रोचीप अमेरिकेतून येते. त्यामध्ये मतांच्या हेराफेरीचा प्रोग्राम सेट करण्याची व ते परदेशातून ऑपरेट करण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही.

ईव्हीएम मशीनमुळे लोकशाहीचा गळा घोटला जात असून, देशातील सर्व निवडणुका बॅलेटपेपरवर होण्याची गरज असल्याचे संघटनेचे म्हणने आहे. सर्व ग्रामपंचायतींनी निवडणुका ईव्हीएम मशीनवर न घेता बॅलेटपेपरवर घेण्याचा ठराव घेण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisement

घेतलेला ठराव जिल्हाधिकारी, निवडणूक आयोग, प्रधानमंत्री कार्यालयाला पाठवण्याचे सांगण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेचे ठरावला संसदेच्या ठराव इतकेच महत्त्व भारतीय राज्यघटनेने दिलेले असल्यामुळे हा ठराव ईव्हीएम मशीन बंद करण्यास महत्त्वाचा ठरणार आहे.

ग्रामपंचायतीचा ठराव जिल्हाधिकारी, राज्य सरकार किंवा केंद्र सरकार रद्द करू शकत नाही. मग मत प्रक्रियेबाबत घटनात्मक पेच निर्माण होऊन हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाऊन राज्यघटनेचा अवमान न करता घटनात्मक तरतुदीनुसार ईव्हीएम मशीन बंद होणार असल्याची भावना जालिंदर चोभे मास्तर यांनी व्यक्त केली आहे.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li