पाच दिवसांत जिल्ह्यात आढळले चार हजार कोरोनाबाधित

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- जिल्ह्यात पुन्हा एकदा करोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. यामुळे मोठी चिंता वाढली आहे.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची धक्कादायक आकडेवारी पाहता नागरिकांमध्ये धाकधूक वाढली आहे. जिल्ह्यात पाच दिवसांत तब्बल चार हजारावर नव्या बाधितांची भर पडली आहे.

जिल्ह्यातील 4 हजार 251 तर नगर शहरातील 1 हजार 404 जणांना या दरम्यान कोरोनाची बाधा झाली आहे.

नगर शहरासह जिल्ह्यात आज रेकॉर्ड ब्रेक कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याचा आकडा सिव्हील हॉस्पिटलच्या लॅबमधून बाहेर पडला.

नगर शहरात 457 तर जिल्ह्यात 1338 बाधितांची नव्याने भर पडल्याचे नगरकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

नव्या बाधितांच्या भरीमुळे जिल्ह्याची वाटचाल लॉकडाऊनकडे सुरू झाल्याची चर्चा आहे. कलेक्टरांनी तालुकानिहाय आढावा बैठका घेतल्या असून कोरोना नियमांचे पालन करण्यावर भर दिला आहे.

त्याचे उल्लंघन झाल्यास संबंधित अस्थापनावर कारवाईचे आदेश नगरपालिका/तहसीलदारांना दिले आहेत.

नियमांचे पालन होत नसल्यानेच कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे

कोरोनाला रोखण्यासाठी नगरकरांनी स्वत:हून नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|