Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

सोन्याच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:-गेल्या काही दिवसात सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचं दिसत असताना आज अचानक सोन्याच्या भावाने उचल खाल्ली आहे.

सोन्याच्या भावात एक हजारांची वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. मुंबईत 22 कॅरेटच्या सोन्याचा भावात एक हजारांची वाढ होऊन तो 44,020 रुपये इतका झाला आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 45,020 इतका आहे.

Advertisement

एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते जागतिक स्तरावर सोन्याच्या किंमतीतील वाढ आणि रुपया कमकुवत झाल्यामुळे सोन्याच्या किंमती वाढल्या. तथापि, गेल्या सत्रातील 64,747 प्रति किलो असलेला चांदीचा भाव 637 रुपयांनी घसरून,

64,110 रुपये प्रतिकिलो राहिला गुरुवारी सुरूवातीच्या व्यापारातील डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 7 पैशांनी वधारून 72.62 वर पोहोचला. भारत आणि जगातील इतर काही भागांमध्ये वाढत्या कोरोना व्हायरस प्रकरणामुळे चिंता वाढत आहे.

Advertisement

गुरुवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया सात पैशांनी घसरून 72.62 वर आला. इंटरबँक परकीय चलन बाजारात रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 72.68 वर उघडला आणि नंतर तोटा झाल्याने तो 72.62 वर पोहोचला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li