Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

नवनाथ विद्यालयाला नगर तालुक्यात तंबाखूमुक्त शाळा होण्याचा प्रथम बहुमान

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- निमगाव वाघा येथील नवनाथ विद्यालयाने नगर तालुक्यात तंबाखूमुक्त शाळा होण्याचा प्रथम बहुमान पटकाविला आहे.

शासनाच्या आरोग्य विभागाने पारित केलेल्या नवीन निकषाप्रमाणे जिल्हा तंबाखूमुक्त नियंत्रण अभियानांतर्गत लाम मुंबई फाऊंडेशन व हम संस्थेच्या वतीने शाळेचे परीक्षण करुन तंबाखूमुक्त शाळा होण्याचे प्रमाणपत्र दिले असल्याची माहिती उपक्रमशील शिक्षक उत्तम कांडेकर यांनी दिली.

Advertisement

तंबाखू मुक्त अभियानातंर्गत शाळेत पालक, विद्यार्थी यांना तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली. तर तंबाखू मुक्तीसाठी विविध स्पर्धा व उपक्रमे घेण्यात आले.

शाळेच्या 100 मीटर अंतराच्या परिसरात तंबाखू विक्री व सेवन करणार्‍या व्यक्तीला दंडात्मक कारवाईच्या सुचना करुन तंबाखूची विक्री व सेवन रोखण्यात आले. हा बहुमान मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष साहेबराव बोडखे, सचिव भागचंद जाधव, मुख्याध्यापक किसन वाबळे यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

Advertisement

या उपक्रमास डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी उत्तम कांडेकर, निळकंठ वाघमारे, काशीनाथ पळसकर, दत्तात्रय जाधव, क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार, शुभांगी धामणे,

मंदा साळवे, तुकाराम खळदकर, लहानबा जाधव आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. हा बहुमान मिळाल्याबद्दल गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी शाळेचे अभिनंदन केले आहे.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

li