Breaking News Updates Of Ahmednagar

डोळ्यात मिरचीची पूड टाकून ठेकेदाराला लुटले; शहरातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- जिल्ह्यात वाढती गुन्हेगारीमुळे अहमदनगर जिल्हा गुन्हेगारीबाबत राज्यात प्रथम स्थानी पोहचला आहे.

शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी वाढू लागली आहे. यातच शहरात एक धक्कादायक घटना घडली असल्याचे समोर आले आहे.

Advertisement

डोळ्यात मिरचीपूड टाकून पाईपलाईन रोडच्या भाजी बाजार ग्राउंडवर ठेकेदाराला लुटण्यात आले. काल बुधवारी रात्री ही घटना घडली.

अमर देवीदास बोरा (रा. तपोवन हडको) असे लूट झालेल्या तरुण ठेकेदाराचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,

Advertisement

अमर बोरा हे पार्टनरशिपमध्ये प्लॉट घेण्यासाठी नगरसेवक मनोज दुलम यांना भेटण्याकरिता गेले होते.

भिस्तबाग चौकात दुलम, सचिन कासार व बोरा यांच्यात चर्चा झाल्यानंतर ते भाजीबाजारच्या मैदानातून घराकडे जात होते.

Advertisement

रात्री दहाच्या सुमारास तोंड बांधलेल्या आठ अज्ञात दरोडेखोरांनी बोरा यांना अडवित त्यांच्या मोपेडची मोडतोड करत 90 हजार रुपयांची रोकड लुटली.

दरम्यान शहरातील वर्दळीच्या परिसरात हि घटना घडली असल्याने शहरातील गुन्हेगारी मध्ये झालेली वाढ लक्षात येत आहे.

Advertisement

तसेच या चोरट्याने पोलिसांचा अजिबातच धाक उरलेला नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ठ झाले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
Advertisement
li