This Website Is Part Of TBS Media Group
अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- राज्यासह जिल्ह्यात वेगाने फोफावत चाललेला कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रत्येकाने आता मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
जर असे आढळून न आल्यास म्हणजेच या नियमांचे उल्लंघन एखाद्या आस्थापनामध्ये होत असेल, तर ती आस्थापना 7 दिवस बंद करण्यात येणार आहे.
तसे अधिकार तालुकास्तरावर तहसीलदार यांना व नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रात मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी याबाबत आदेश काढले आहेत. करोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी मास्कचा व सॅनिटायझऱचा वापर करणे,
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, या नियमांचे उल्लंघन करणार्या सर्व आस्थापनांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
त्यासाठीचे अधिकार ग्रामीण स्तरावर तहसीलदार यांना नगर नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर मुख्याधिकारी यांना दिले जात असल्याचे आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
हे अधिकारी 15 एप्रिल पर्यंत देण्यात आले असून कारवाईचा अहवाल हा जिल्हाधिकारी कार्यालयाला द्यावा, असेही आदेशात म्हंटले आहे.
दरम्यान जिल्हात करोना प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. वाढत्या करोना संसर्गाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|