Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

भारत बंदला काँग्रेसचा जाहीर पाठिंबा; पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ मागे घ्या

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी. तसेच केंद्र सरकारने शेतकरी, कामगार विरोधी केलेले काळे कायदे रद्द करावेत अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

शेतकरी संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंदला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असल्याचे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी जाहीर केले आहे. शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाच्या वतीने किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

Advertisement

निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यावेळी काळे बोलत होते. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, क्रीडा काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, विद्यार्थी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष वीरेंद्र ठोंबरे,

अल्पसंख्यांक काँग्रेस अध्यक्ष अज्जू शेख, महिला सेवादल अध्यक्ष कौसर खान, इंटक जिल्हाध्यक्ष हनिफ शेख उपस्थित होते. यावेळी बोलताना काळे म्हणाले की, शंभर दिवस उलटून गेले. सुमारे तीनशेहून अधिक शेतकऱ्यांचा उपोषणा दरम्यान दिल्ली सीमेवर मृत्यू झाला.

Advertisement

पेट्रोल-डिझेलच्या किमती शंभरीला जाऊन पोहोचल्या. भविष्यात गॅसची किंमत देखील हजारापर्यंत पोहोचल्यास आश्चर्य वाटू नये. मात्र केंद्रातील भाजप सरकार यावर कोणतीही ठोस पावले उचलायला तयार नाही ही देशवासीयांसाठी अत्यंत खेदाची बाब आहे.

या सर्व पार्श्‍वभूमीवर शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आम्ही पाठिंबा देत आहोत. महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, आ.डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली शहरात केंद्राच्या विरोधात लढा अधिक तीव्र करण्याची भूमिका भविष्यात घेतली जाईल,

Advertisement

असा इशारा यावेळी काळे यांनी दिला आहे. मुंबईत प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले तसेच काँग्रेस नेत्यांनी तर श्रीरामपूर मध्ये महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे यांच्यासह काँग्रेस नेते, पदाधिकाऱ्यांनी भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी उपोषण केले आहे.

उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्षा आ. प्रणितीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठीकठिकाणी निवेदने देण्यात आली. नगर शहरात प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारत बंदला पाठिंबा देण्यात आला. यावेळी अनंतराव गारदे, खालील सय्यद, विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, निजाम जहागीरदार,

Advertisement

गणेश आपरे, शंकर आव्हाड, नलिनी गायकवाड, जरीना पठाण, उषा भगत, सुमन कलापहाड, शबाना शेख, मंगल साठे, लता वाघमारे, भिंगार काँग्रेसचे कॅ. रिजवान शेख, सागर दळवी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li