Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:- सध्या देशभरात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. तर राज्यातही मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्णवाढ कायम असून कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. 

Advertisement

अहमदनगर जिल्ह्यात काही तासांमध्ये 654 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. त्यात नगर शहरात 225 रुग्णांचा समावेश आहे.

अहमदनगर शहर 225, राहाता 50, संगमनेर 59, श्रीरामपूर 55, नेवासे 14, नगर तालुका 33, पाथर्डी 17, अकाेले 18, काेपरगाव 53, कर्जत 17,

Advertisement

पारनेर 38, राहुरी 15, भिंगार शहर 06, शेवगाव 21, जामखेड 18, श्रीगाेंदे 02 आणि इतर जिल्ह्यातील 13 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.

जिल्हा रुग्णालयानुसार 94, खाजगी प्रयाेगशाळेनुसार 380 आणि रॅपिड चाचणीमध्ये 180 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.

Advertisement

देशात वर्षातील सर्वाधिक रुग्णवाढ नोंद :- देशात गेल्या २४ तासांत पुन्हा एकदा या वर्षातील सर्वाधिक रुग्णवाढ नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये तब्बल ६२ हजार २५८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

एका दिवसात लागण होण्याचा हा या वर्षातील उच्चांक आहे. १६ ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच देशात इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले असून यासोबत रुग्णसंख्या १ कोटी १९ लाखांवर पोहोचली आहे.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

li