This Website Is Part Of TBS Media Group
अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:-केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला शेवगाव शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग घेतला.
महाविकासआघाडी मधील सर्व घटक पक्ष तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष वंचित बहुजन आघाडी व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या सह सर्व पक्षांनी या बंदला पाठिंबा दर्शवला होता,
यावेळी सर्वपक्षीय मोर्चेकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली.
तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.अमोल फडके यांनी केंद्र सरकारचा इंधन दरवाढीबद्दल चांगलाच समाचार घेतला, तसेच १२० दिवसापासून शहीद होत असलेल्या
शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी देखील पंतप्रधानांकडे वेळ शिल्लक नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला, तसेच शिवसेनेचे तालुकाप्रमुख अविनाश मगरे यांनी शेतकरी विरोधी कायदे केंद्र सरकारने त्वरित मागे घ्यावेत अशी मागणी केली.
यावेळी वंचित चे तालुकाध्यक्ष प्यारेलाल भाई शेख यांनीही केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. भाकपचे कॉम्रेड संजय नांगरे यांनी भाजप सरकारला शेतकऱ्यांनी हाकलून लावावे असे आवाहन सर्व शेतकरी बांधवांना केले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|