Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगर जिल्ह्यातील या’ गावात कोरोनाचा विस्फोट : ८ दिवस गाव बंद!

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- नगर तालुक्यातील अरणगाव येथ कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असल्याने प्रशासनाच्या वतीने अरणगाव आठ दिवसासाठी बंद करण्यात आले आहे.

येथील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दोनशेच्यावर गेल्याने तालुका प्रशासनाने गावात ८ दिवस कंटेन्टमेंट झोन जाहीर केला आहे. नगर शहरालगत असणाऱ्या गावांमध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

Advertisement

शेकडो रुग्ण सध्या शहरातील खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. तालुक्यात १ मार्च ते २५ मार्च पर्यत ५००पेक्षा रूग्ण आढळुन आले आहेत. अरणगावमध्ये दि.२६ मार्च नंतर दोनशेपेक्षा जास्त रुग्ण आढळुन आल्याची माहिती सुत्रांनी दिली.

मात्र आरोग्यविभागाच्या लेखी अरणगावमध्ये फक्त २६ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याची माहिती आहे.

Advertisement

दरम्यान अरणगाव मध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने तहसीलदार उमेश पाटील यांनी शनिवारी आदेश काढुन गावातील बहुतांशी भाग दि.८ एप्रिल पर्यत कंन्टेमेंट म्हणून जाहीर केला असून,

आज गावातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व गाव बंद करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामसुरक्षा समितीने गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार गावठाण,

Advertisement

मारुती नगर, दळवी मळा, शिंदे वाडी, नाट मळा या ठिकाणी तहसीलदार यांचे आदेशान्वये कंटेन्टमेट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणचा परिसर संपूर्णपणे प्रतिबंधित करण्यात येत आहे. तसेच जाधव मळा ढमढेरे वस्ती,

मतकर वस्ती टी.बी सेंटर या ठिकाणी तहसीलदार याचे आदेशान्वये बफर झोन म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. या ठिकाणी अत्यावश्यक सेवा पूर्ण वेळ सुरु राहतील. मात्र इतर सर्व दुकाने आठ दिवस दि.८ एप्रिलच्या मध्य रात्रीपर्यंत बंद राहतील.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

li