Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

डॉ. सुजय विखे म्हणाले सहकार चळवळ संपवायला निघाले होते, मात्र आम्ही

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ७१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली.

यावेळी मार्गदर्शन करताना खा. सुजय विखे म्हणाले की, सहकारी साखर कारखानदारीबाबत केंद्र सकारात्मक आहे. त्यांनी चांगले निर्णय घेऊन विकसात्मक पाऊले उचलली आहेत.

Advertisement

अनेक जण सहकार चळवळ संपवायला निघाले होते.अनेकांनी स्वत:चे कारखाने काढले. आम्ही मात्र ही चिळवळ निस्वार्थपणे पुढे नेत आहोत.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ७१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत खासदार डॉ. सुजय विखे बोलत होते.

Advertisement

अनेकांनी खासगी कारखाने काढले. आपण मात्र आव्हानात्मक परिस्थितीवर मात करुन सहकाराची चळवळ निस्वार्थपणे पुढे घेवून जात आहोत.

यामध्ये आमचा कोणताही स्वार्थ नाही. कर नाही त्याला डर कशाची, असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे यांनी केले.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

li