Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

आमदार अरुण जगताप यांचे नगरच्या विकासात मोठे योगदान

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- गेल्या अनेक वर्षापासून शहराचे प्रश्न सोडववून विकास कामांना प्राधान्य देणारे आमदार अरुण जगताप यांचे नगरच्या विकासात मोठे योगदान आहे.

भेदभाव न ठेवता आलेल्या प्रत्येकाचे ते प्रश्न सोडवत असतात. सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक, क्रीडा व राजकारण अशा सर्वच क्षेत्रात आमदार अरुण जगताप आज अग्रस्थानी आहेत, असे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक यांनी केले.

Advertisement

हिंद सेवा मंडळाच्या वतीने आमदार अरुण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मंडळाचे कार्याध्यक्ष अजित बोरा यांनी सत्कार करून अभिष्टचिंतन केले. यावेळी अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, दादा चौधरी विद्यालयाचे चेअरमन सुमतीलाल कोठारी,

पेमराज सारडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र शिंदे, प्रबंधक अशोक असेरी, पर्यावेक्षक डॉ.सुजित कुमावत, ज्ञानेश्वर रासकर आदी उपस्थित होते. यावेळी आमदार अरुण जगताप यांनी सर्वांचे आभार मानले.

Advertisement

प्रा. मोडक म्हणाले, हिंद सेवा मंडळाच्या शाळा व महाविद्यालयांना वेळोवेळी सहकार्य करत मोठा आमदार निधी त्यांनी दिला आहे. हिंद सेवा मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आज जे अत्याधुनिक व दर्जेदार शिक्षण मिळत आहे.

त्यात आमदार जगताप यांचे बहुमोल योगदान आहे. अजित बोरा म्हणाले, शाळांमध्ये विविध सुविधांसाठी आमदार अरुण जगताप यांच्या कडे आम्ही जेव्हा जेव्हा निधीची मागणी केली तेव्हा प्रत्येकवेळी तत्परतेने आमच्या मागण्या मान्य करत विकास निधी दिला आहे.

Advertisement

मंडळाच्या शाळांच्या प्रगतीसाठी मोठे सहकार्य जगताप कुटुंबीय करत आहेत. सुमतिलाल कोठरी म्हणाले, आमदार अरुण जगताप हे नगरकरांनचे हक्काचे आमदार आहेत.

सर्व जाती धर्माला बरोबर घेत ते नागरिकांच्या समस्या सोडवत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याचा हिंद सेवा मंडळाला अभिमान आहे.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

li