Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- भरधाव वेगातील मोटरसायकल स्वराचे दुचाकीवरील ताबा सुटल्याने मोटरसायकल रस्त्याच्या बाजूला जाऊन रस्त्यानी जाणार्‍या अशोक सिताराम मांडगे ( वय 47 रा. माळकुप तालुका पारनेर ) यांना धडक दिली.

दरम्यान या अपघातात एकजण जखमी झाला आहे. ही घटना बस स्टँडवर ओवर ब्रिजमध्ये देहरे येथे घडली होती.

Advertisement

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अशोक सिताराम मांडगे हे रस्त्याने जात असताना नगर मनमाड रोड वरील वर्ग मध्ये नेटवर्क केबलचे काम चालू असलेल्या ठिकाणी भरधाव वेगात आलेल्या मोटरसायकलने मांडगे यांना जोराची धडक दिली.

या अपघातात मांडगे हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी यांच्या फिर्यादीवरून अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार पवार हे करीत आहेत.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

li