Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

मंगल कार्यालयात २०० लोकांना परवानगी द्या !

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- मंगल कार्यालय, लॉन्समधील कार्यक्रमांसाठी ५० ऐवजी २०० लोकांच्या कार्यक्रमांसाठी परवानगी मिळावी, अशी मगाणी अहमदनगर शहर मंगल कार्यालय, लॉन्स असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

याप्रसंगी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, असोसिएशनचे अध्यक्ष भगवान फुलसौंदर, उपाध्यक्ष मदन आढाव, सचिव चंद्रकांत फुलारी, अजिंक्य पवार, राजेंद्र उदागे, जालिंदर कोतकर,

Advertisement

जयंत जाधव, संजय जाधव, अभिमन्यू नय्यर, अमित मुथा, प्रमोद लगड, रमाकांत गाडे आदि उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील मंगल कार्यालय, हॉल, लॉन्स गेल्या वर्षभरापासून कोरोना प्रादुर्भावामुळे व्यावसाय बंद असल्याने आर्थिकदृष्ट्या होरपळून निघाले आहेत.

सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात शासनाचे टॅक्स, हॉलचा असणारा अवाढव्य खर्च, बँकांची कर्ज, आदि खर्चाने मंगल कार्यालय मालक हे आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत.

Advertisement

कोविडचे संकट दुर होत असतांना पुन्हा पेशंट वाढल्याने पुन्हा मंगल कार्यालय / हॉल चालक यांच्यावर शासनाचे नियम व अटी लागू करण्यात आलेल्या आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

 

Advertisement
li