Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

प्रादुर्भाव वाढताच मनपा आणखी दोन कोवीड सेंटर सुरु करणार

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्यने महापालिकेने नटराज हॉटेल आणि जैन पितळे बोर्डिंगमध्ये कोवीड सेंटर सुरू केले.

तेथे 210 बाधितांवर उपचार करता येणार आहे. आता महापालिकेने आणखी दोन ठिकाणी नव्याने कोवीड सेंटर करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

गेल्या आठवड्यापासून नगर शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून उपचार घेणार्‍या बाधितांची संख्या दीड हजाराच्या घरात पोहचली आहे.

त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरात आणखी दोन ठिकाणी कोवीड सेंटर सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

Advertisement

आनंद लॉन व शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज येथे पुन्हा एकदा नव्याने याच आठवड्यात कोविड सेंटर सुरु करण्यात येणार आहे. तशी माहिती आयुक्त गोरे यांनी दिली.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना घरी न थांबता कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होण्याचे आवाहन त्यांनी केले.कोणत्याही कोरोना रुग्णांवर उपचार कमी पडणार नसून

Advertisement

याची दक्षता म्हणून शहरात आणखी काही ठिकाणी कोवीड सेंटर करीता जागेची पाहणी सुरू आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी दिली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विट

Advertisement
li