Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

नगरसेविकेच्या मुलाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- पिंपरी-चिंचवडमध्ये नगरसेविकेच्या मुलाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

रात्री उशिरा उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. प्रसन्न शेखर चिंचवडे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रसन्न अवघ्या २१ वर्षांचा होता.

Advertisement

करुणा शेखर चिंचवडे असे मयत प्रसन्नच्या आईचे नाव असून त्या भाजपाच्या नगरसेविका आहेत.

चिंचवडमधील राहत्या घरात प्रसन्नने वडिलांच्या परवानाधारक पिस्तूलातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

Advertisement

पिस्तूलातून गोळी झाडल्यानंतर झालेल्या आवाजामुळे ही घटना उघडकीस आली. जखमी प्रसन्नला तातडीने खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं.

मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती चिंचवड पोलिसांनी दिली आहे. प्रसन्न कुटुंबातील व्यक्तींसोबत नवी कार खरेदी करण्यासंदर्भात शोरुममध्ये जाऊन आले होते.

Advertisement

मात्र, रात्री अचानक त्याने पिस्तूलातून गोळी झाडून आत्महत्या केली आहे. प्रसन्न हा शांत आणि मन मिळाऊ स्वभावाचा होता. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल प्रसन्नने का उचलले हे अद्याप समजू शकले नाही.

दरम्यान, प्रसन्न हा पिस्तूलाशी खेळत असताना चुकून गोळी सुटून तर मृत्यू झाला नाही ना ?, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. या दिशेने देखील चिंचवड पोलीस तपास करत आहेत.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

li