Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

जयंत पाटील म्हणतात, आपल्या पंतप्रधानांवर विश्वास असायलाच हवा !

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- बांग्लादेशच्या दौर्‍यावर असताना बांग्लादेश मुक्ती लढ्यात सहभागी झाल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याची समाजमाध्यमातून जोरदार खिल्ली उडवण्यात आली.

आता, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनीही मोदींच्या त्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर भाष्य करताना, आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर आपला विश्वास असायलाच हवा ! असा टोला पाटील यांनी ट्विटरवरुन लगावला.

Advertisement

आपले पंतप्रधान बांग्लादेश मुक्तीच्या लढ्यात नक्की कधी अटक झाले, त्यांना कोणत्या पोलीस स्टेशन किंवा जेलमध्ये ठेवले होते याची माहिती त्यांनी दिली तर देशवासियांचा लाडक्या पंतप्रधानांवरील विश्वास अधिक दृढ होईल असा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला.

बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात आम्हीही सहभागी झालो होतो. तेव्हा मी २० ते २२ वर्षांचा असेन. माझ्या अनेक सहकाऱ्यांनी बांगलादेशच्या लढ्यात सहभागी होत सत्याग्रह केला होता.

Advertisement

ते माझे पहिलेच आंदोलन होतं, असं पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेश दौऱ्यादरम्यान बोलताना म्हटलं होतं. बांगलादेश स्वातंत्र्य लढ्याच्या ५० व्या वर्षाच्या निमित्ताने मला निमंत्ऱण देण्यात आले.

या गौरवशाली सोहळ्यात सहभागी होता आले, हे माझे भाग्य समजतो, असंही ते म्हणाले होते. बांगलादेश आणि भारतातील संबंध आणखीन दृढ होतील. येथील नागरिकांचे मन आणि विश्वास दोन्ही भारताने जिंकले आहे, असेही मोदींनी बांग्लादेश दौऱ्यात म्हटले आहे.

Advertisement

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही पंतप्रधानांवर जोरदार टीका केली आहे. नाना पटोले यांनी मोदीजी अजून किती फेकणार अशी विचारणा केली आहे. “अजून किती फेकणार मोदीजी, हद्द झाली राव.

शेतकरी आंदोलनावर एक शब्दही तुमच्या तोंडून निघाला नाही आणि स्वातंत्र्याबद्दल बोलण्यासाठी बांगलादेशला जाता. तुम्ही शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हणाला होतात. आता तुम्ही कोण झालात ढोंगीजीवी” असं नाना पटोले यांनी म्हटलं होते.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

li