Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

कुटुंबासोबत जेवण केल्यानंतर संपवले जीवन?

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- पिंपरी चिंचवडमधील भाजप नगरसेविकेच्या मुलाचा डोक्यात बंदुकीची गोळी लागल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

प्रसन्न चिंचवडे (21) असे मृताचे नाव आहे. काल (28 मार्च) रात्री 9.15 च्या सुमारास ही घटना घडली. हा प्रकार पिंपरी-चिंचवडमधील भाजप नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या राहत्या घरात घडला.

Advertisement

चिंचवडमधील वाल्हेकरवाडी रस्त्यावर चौपाटी चौकात करुणा चिंचवडे यांचा बंगला आहे. या बंगल्यात त्यांचे एकत्र कुटुंब राहत होते. रात्री नऊच्या सुमारास सहकुटुंब जेवणानंतर प्रसन्न वरच्या खोलीत गेला.

त्यावेळी त्याच्याकडे वडील शेखर चिंचवडे यांची परवानाधारक बंदूक होती. यानंतर काही वेळाने अचानक बंदूकीचा आवाज आला. यानंतर घरातील कुटुंबियांनी तातडीने वरच्या खोलीत धाव घेतली.

Advertisement

त्यावेळी प्रसन्न जखमी अवस्थेत असल्याचे त्यांना दिसले. यानंतर त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुर्देवाने त्याचा मृत्यू झाला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li