Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

काचबिंदूने अंधत्व आलेल्या मुक्ताबाईना फिनिक्सने दिली नवदृष्टी

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- एक वर्षापुर्वी काचबिंदूने अंधत्व आलेल्या मुक्ताबाई धाडगे या आजीबाईंना फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीराच्या माध्यमातून नवदृष्टी मिळाली.

निकामी झालेल्या डोळ्यास पुन्हा दृष्टी लाभल्याने आजीबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. फिनिक्स सोशल फाऊंडेशनने नागरदेवळे (ता. नगर) येथे नुकतेच मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले.

Advertisement

या शिबीरात बुर्‍हाणनगर येथील मुक्ताबाई धाडगे (वय 63) या आजीबाई दोन्ही डोळ्यांनी दिसत नसल्याने हजर झाले होते. त्यांची तपासणी केली असता एक डोळ्यात काचबिंदूचा अंतिम टप्पा तर दुसर्‍या डोळ्यास पडदा आल्याने अंधत्व आल्याचे निष्पन्न झाले.

टाळेबंदीनंतर आर्थिक परिस्थिती नाजुक असल्याने काचबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च येणार होता. मुक्ताबाईना हा खर्च पेळवणार नसल्याने त्यांनी फिनिक्स फाऊंडेशनच्या शिबीरात डोळ्यावर उपचार करण्याची विनंती केली.

Advertisement

त्यांच्या डोळ्यांची संपुर्ण तपासणी करुन त्यांना आनंदऋषीजी नेत्रालयात शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले. मात्र एक डोळ्यात काचबिंदूचा अंतिम टप्पा असल्याने या अवघड शस्त्रक्रियेत डोळा निकामी होण्याची भिती डॉक्टरांनी वर्तवली.

शेवटी नाईलाजाने डोळा काढण्याची डॉक्टर व रुग्णांची तयारी झाली होती. पाच ते सहा दिवस त्यांचा डोळा वाचविण्यासाठी अथक प्रयत्न करुन विविध चाचण्या करण्यात आल्या. सात दिवसानंतर ही काचबिंदूची अवघड शस्त्रक्रिया डॉ. नेहा भारडिया यांनी यशस्वी केली.

Advertisement

यामध्ये डोळा वाचून आजीबाईंना नवदृष्टी लाभली. यशस्वी शस्त्रक्रिया होऊन परतलेल्या आजीबाईंचा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी सत्कार केला. तर लवकरच दुसर्‍या डोळ्यावरील पडदा काढण्याची शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहे.

डोळा न दुखता चांगल्या पध्दतीने शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, डोळ्याने चांगले पाहता येत आहे. माणुसकीच्या भावनेने फिनिक्स फाऊंडेशनने केलेल्या सहकार्यामुळे ही नवदृष्टी मिळाल्याची भावना मुक्ताबाई धाडगे यांनी व्यक्त केली.

Advertisement

फिनिक्स फाऊंडेशन घेत असलेल्या मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराच्या माध्यमातून अनेक दीनदुबळ्या, कामगारवर्ग व आर्थिक दुर्बल घटकांना नवदृष्टी मिळत असल्याचे बोरुडे यांनी म्हंटले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li