Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

राहते घर खाली करण्यासाठी लॅण्ड माफीयांची दहशत

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:- राहते घर खाली करण्यासाठी व बेकायदेशीररित्या जागेचा ताबा घेण्यासाठी जेसीबी व इतर साहित्य घरी आणून जीवे मारण्याची धमकी देणार्‍या लॅण्ड माफियावर कारवाई करावी.

तसेच गुंडांना सोडून आमचे घर खाली करुन देण्यासाठी लॅण्ड माफियास तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनरीक्षक सहकार्य करीत असल्याचा आरोप दीपक ओमप्रकाश कुडिया यांनी करुन संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिले.

Advertisement

दीप कुडिया यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, आंम्ही सावेडी, वसंत टेकडी येथे कुटुंबीयांसह राहत आहे. जागेची ताबा असलेली विसार पावती व ताबा पावती माझ्याकडे आहे. येथेच माझे आर्यन डॉग फॉर्म असून, सदर फार्ममध्ये वेगवेगळ्या जातीच्या कुत्र्याचे खरेदी-विक्रीचे व्यवहार चालतात.

सदरचे फार्म बाबतचा अधिकृत परवाना देखील माझ्याकडे आहे. मी ही जागा स्वतःच्या निवासा करिता व कुत्र्याच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करण्याकरिता वापरत असून, मिळकतीचे मालक सोनाबाई खेडकर, शोभा फुदे व अंबादास कीर्तने यांनी कधीही हरकत घेतलेली नाही.

Advertisement

अगर अडथळा केलेला नाही. तसेच कसल्याही प्रकारची नोटीस मला दिलेली नाही. ही मिळकत मी सुमारे चौदा वर्षांपासून विना हरकत अडथळा वापरत असल्याने दिवाणी कायद्याप्रमाणे मी या जागेचा मालक झालेलो आहे.

सदर जागेवर अंबादास किर्तने यांचे नावे असून, सदरची क्षेत्रावर माझ्या कब्जा मध्ये 2007 पासून असल्याची सानप यांना माहिती आहे. त्यामुळे ही जागा मला देण्याकरिता माझ्याशी करार केलेला आहे.

Advertisement

ही वस्तुस्थिती माहित असताना देखील संजय सानप यांनी जेसीबीसह 25 ते 30 गुंड आणून कुत्र्यांचे पिंजरे तोडून टाकले आणि कुटुंबीयांनी जीवे मारण्याची धमकी दिली. सानप माझ्यावर दबाव आणण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करण्याचे धमक्या देत आहे.

तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनरीक्षक देखील कायदेशीर अधिकार नसताना सदर मिळकत सानप यांना देण्यास भाग पाडत आहे.

Advertisement

सानप हे गुंड प्रवृत्तीचे असून, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. या मिळकतीवर माझा हक्क असल्याचे कुडिया यांनी नमुद केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li