This Website Is Part Of TBS Media Group
अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-मुंबईत जवळपास दीड लाखांहून अधिक वृद्ध, काही अंथरुणावर खिळलेले, काही दिव्यांग आहेत. ते लसीकरणासाठी घराबाहेर जाऊ शकत नाहीत. यासंदर्भात केंद्राला पत्र लिहिले होते.
अशा नागरिकांना घरी जाऊन लस देण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, केंद्राने असे कोणतेही धोरण नाही, असे सांगितले आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
केंद्रीय आरोग्य विभागाच्या स्पष्टीकरणानुसार, देश सध्या कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेच्या मध्यभागी आहे. लसीकरण सूक्ष्म पातळीवर नेण्याची केंद्राची योजना असून या योजनेत नागरिकांना लसीकरणासाठी दोन किमीपेक्षा जास्त प्रवास करावा लागणार नाही.
मुंबई पालिकेने वृद्ध, दिव्यांगांसाठी घरोघरी जाऊन लसीकरणासाठी प्रस्ताव तयार केला होता. मात्र केंद्रीय आरोग्य विभागाने घरोघरी लसीकरणासाठी धोरण नसल्याचे सांगत हा प्रस्ताव नाकारला.
लसीकरण केंद्रांचा विस्तार काही प्रमाणात छोट्या-छोट्या लसीकरण केंद्रांपर्यंत लहान स्तरापर्यंत केला जाणार आहे. जेणेकरून लोकांना कोविडची लस घेण्यासाठी दोन किलोमीटरच्या पुढे प्रवास करावा लागणार नाही.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|