Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

लॉकडाऊन असतानाही राहात्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत वाढ

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-गेल्या काही दिवसापासून राहाता तालुका करोनाचा हॉटस्पॉट बनला असून सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून येत असल्यायन राहात्यात सात दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता.

लॉकडाऊन असूनही तालुक्यातील रुग्णसंख्या काही केल्या कमी होताना दिसून येत नाही आहे. गेल्या 24 तासात राहाता तालुक्यात 79 जण करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. सर्वाधीक 18 रुग्ण साकुरीत तर राहाता 14, लोणी 11 रुग्ण सापडले.

Advertisement

शिर्डी येथील कोव्हिड सेंटर फुल्ल झाले असून औषधे ऑक्सीजन व डॉक्टरांची मोठी कमतरता जाणवत असून रुग्णांना कॉट मिळत नसल्याच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत.

तालुक्यात गेल्या 24 तासांत 79 जणांना करोनाची बाधा झाली असून सर्वाधीक 18 रुग्ण साकुरीत तर 14 रुग्ण राहाता शहरात सापडले. लोणीत 11 रुग्ण, शिर्डीत 8 जण, पाथरे 4 जण, तसेच वाकडी, तिसगांव, कोल्हार, सावळीविहीर, रांजणगांव, पिंपळस, पुणतांबा, निर्मळ पिंप्री,

Advertisement

नपावाडी, ममदापूर, लोहगाव, कोर्‍हाळे, गोगलगाव, एकरुखे, बाभळेश्वर या गावांतही करोना रुग्ण सापडले आहेत. तालुक्यात गेल्या महिनाभरापासून करोनाने कहर केला असून राहाता तालुका करोनाचा हॉटस्पॉट बनला आहे.

आठ दिवसांत सर्वाधीक रुग्ण बाधित झाले असून सरकारी व साई संस्थानचे कोव्हिड सेंटरबरोबर खासगी कोव्हिड सेंटरही हाऊसफुल्ल झाले आहे.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

li