Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

चांदबिबी महाल परिसरात पुन्हा बिबट्या !

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-चांदबिबी महालाच्या रस्त्यावर मंगळवारी सकाळी काही जणांना बिबट्या दिसला. या भागात फिरायला जाणारे नगरमधील सुनील माळवदे यांच्या कारला बिबट्या आडवा पळाला.

त्यांनी या बाबत व्याघ्र संरक्षण प्राधिकरणचे सदस्य मंदार साबळे यांना कळवले. साबळे यांनी जिल्हा उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे यांना माहिती दिली.

Advertisement

बिबट्याचा या भागात वावर असला तरी त्याचा उपद्रव मात्र नाही तरीही या भागात फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन थेटे व साबळे यांनी केले आहे..

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li