Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत मोठी भर , मृत्यु वाढले ! वाचा राज्यातील कोरोनाग्रस्तांची सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:- आज दिवसभरात राज्यात तब्बल 39544 नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर आज मृतांचा आकडासुद्धा लक्षणीयरीत्या वाढला असून दिवसभरात राज्यात तब्बल 227 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. 

सध्या राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.34 टक्के असून मृत्यूदर 1.94 टक्क्यांवर पोहोचलाय. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 28,12,980 वर पोहोचला आहे.

Advertisement

कोरोना रुग्णसंख्येत धडकी भरवणाऱ्या प्रमाणात वाढ होताना दिसत असतानाच बुधवारी तब्बल 2400727 रुग्णांनी या संसर्गावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून रजा देण्यात आली. 

परिणामी राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता  85.34% झालं आहे. कोरोना रुग्णसंख्येतील हा चढ- उतार सुरु असतानाच आजच्या दिवशी कोरोनामुळं दगावणाऱ्यांचा आकडाही चिंता वाढवणारा ठरला. 

Advertisement

दिवसभरात 227 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. परिणामी आरोग्य विभाग अधिकच सतर्क झाला आहे. राज्यात सध्याच्या घडीला 3, 56, 243 इतके सक्रिय रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

राज्याची ही स्थिती असतानाच राजधानी मुंबईतही कोरोनाची धास्ती कायम आहे. बुधवारी दिवसभरात राज्यात 5 हजारहून जास्त कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळं मुंबईकरही कोरोनाच्या विळख्यात येत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.

Advertisement

 राज्यातील कोरोनाग्रस्तांची सविस्तर आकडेवारी 

Advertisement

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li