Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

करोनाची दुसरी लाट : काय असेल अहमदनगरची स्थिती?

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-‘’लोकांचा बिनधास्तपणा आणि बेफिकिरी प्रचंड वाढतेय. करोनाची दुसरी लाट आली तर आपल्याला सावरायलाही वेळ मिळणार नाही,’’

असा इशारा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) साथरोग व संसर्गजन्य विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिला आहे.

Advertisement

याला अनुसरून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्याचे काही आकडे सांगून दक्षतेचा इशारा दिला आहे.

  • – एप्रिल महिन्याच्या सुरवातीला त्याचा सर्वोच्च बिंदू असेल. पुढचे शंभर दिवस चिंता वाढविणारे
  • – डॉ. गंगाखेडकर यांच्या गणितानुसार एप्रिलमध्ये नगरला ६,३७० रुग्ण उपचाराधीन असू शकतील
  • – यातील सुमारे १५ टक्के रुग्णांना व्हेंटीलेटरची गरज पडू शकते, ते कमी पडू शकतात.
  • – जिल्ह्यात बेडची उपलब्धता २,२६६ आहे
  • – जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख, ६८ हजार जणांच्या चाचण्या झाल्या
  • – त्यातील ९० हजारावर रुग्ण पॉझिटीव्ह आढळले
  • – सध्या ५,२४२ जणांवर उपचार सुरू आहेत.
  • – आतापर्यंत १९९५ जणांचा मृत्यू झाला आहे.
  • – रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ९२ टक्के आहे
  • – गेल्या दहा दिवसांत नवे ८ हजार, २६५ रुग्ण आढळून आले
  • – आतापर्यंत १ लाख ६५ हजार जाणांचे लसीकरण झाले आहे
  • – जिल्ह्याची लोकसंख्या : ४५ लाख, ४३ हजार (२०११ नुसार)
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li