Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

अंगावर डंपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :-वाळू माफिया विरोधात केलेल्या तक्रारीवरुन अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे अध्यक्ष अरुण रोडे यांच्या चारचाकी गाडीला नगर-कल्याण महामार्गावर ढवळपुरी फाटा येथे विना क्रमांकाच्या डंपरने उडविण्याचा प्रयत्न केला.

या अपघातात जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असल्याने निशुल्क पोलीस संरक्षण देण्याच्या मागणीचे निवेदन रोडे यांनी पोलीस अधिक्षकांना दिले.

Advertisement

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने अरुण रोडे यांनी पारनेर तालुक्यातील अनेक वाळू माफियांविरोधात तक्रारी केल्या आहेत.

तसेच या भागातील अवैध वाळू उपसा बंद होण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरु असून, ते उपोषणाच्या तयारीत आहे.

Advertisement

त्यांना वारंवार वाळू तस्करांकडून धमक्या मिळत आहे. रोडे यांनी जीवितास धोका निर्माण झाला असल्याने पोलीस संरक्षण मिळण्याबाबत केलेल्या पत्रव्यवहाराच्या अनुसरून जिल्हास्तरीय समितीने 19 ऑगस्ट 2020 रोजी पासून त्यांना सशुल्क पोलीस संरक्षण पुरवणे बाबत निर्णय घेतला आहे.

मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने ते पोलीस संरक्षण घेऊ शकले नाही. निशुल्क पोलीस संरक्षण मिळण्यासाठी काही दिवसांपुर्वीच त्यांनी पोलीस अधिक्षक कार्यालय व नाशिक विभागीय विशेष पोलीस महासंचालकांना पाठविले होते.

Advertisement

याची दखल घेतली गेली नसल्याने जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिवीतास यापुढे बरेवाईट झाल्यास याला पोलीस प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे त्यांनी निवेदनात म्हंटले आहे. तर पुन्हा निशुल्क पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li