Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

परिणामांचे गांभिर्य लक्षात घेवून, शासनाने करमाफी द्यावी

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- कोव्‍हीड संकटामुळे शिर्डी शहरातील नागरीक, व्‍यवसायीक आणि हॉटेल चालकांच्‍या अर्थव्‍यवस्‍थेवर झालेला विपरीत परिणामांचे गांभिर्य लक्षात घेवून, शासनाने करमाफी द्यावी अशी मागणी माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या नेतृत्‍वाखाली शिष्‍टमंडळाने नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्‍याकडे केली.

शिर्डी नगरपंचायतीच्‍या शिष्‍टमंडळाने आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या नेतृत्‍वाखाली मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून शिर्डी शहरातील नागरीक, व्‍यापरी आणि व्‍यवसायीकांच्‍या प्रश्‍नांसदंर्भात चर्चा केली.

Advertisement

या चर्चेत आ.विखे पाटील यांनी कोव्‍हीड संकटामुळे शहरातील कोलमडलेल्‍या अर्थव्‍यवस्‍थेची गांभिर्यता मंत्र्यांच्‍या निदर्शनास आणून दिली. खासदार डॉ.सुजय विखे पाटील, नगराध्‍यक्ष शिवाजी गोंदकर, मुख्‍याधिकारी काकासाहेब डोईफोडे, सुजीत गोंदकर, मंगेश त्रिभूवन,

रविंद्र गोंदकर, रविंद्र कोते, अशोक गायके, अभिजीत संकलेचा आदि नगरसेवक आणि व्‍यवसायीक उपस्थित होते. करोना महामारीच्‍या पार्श्‍वभूमिवर शासनाने लागू केलेल्‍या प्रतिबंधात्‍मक तरतुदीमुळे मागील अनेक दिवस श्री.साईबाबांचे मंदिर बंद होते.

Advertisement

त्‍यामुळे भाविकही येवू शकले नाहीत. त्‍यामुळे या तिर्थक्षेत्राच्‍या ठिकाणी असलेले सर्व व्‍यवसायांचे आर्थिक नियोजन कोलमडले असल्‍याकडे आ.विखे पाटील यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले. शिर्डी शहरातील अर्थव्‍यवस्‍था ही संपूर्णपणे येणा-या साईभक्‍तांवर अवलंबुन आहे.

अनेक दिवसांनंतर मंदिर उघडले असले तरी, भाविकांची संख्‍या अत्‍यंत कमी आहे. याचा फटका शहरातील छोटे-मोटे व्‍यवसायीक, हॉटेल चालक यांना मोठ्या प्रमाणात बसल्‍याने या सर्वांवर आर्थिक संकट मोठे आले आहे.

Advertisement

त्‍यामुळे नगरपंचायतीने दिलेली कराची बिलही भरणे मुश्‍कील असल्‍याचे गांभिर्य डॉ.सुजय विखे पाटील यांनी बैठकीत नमुद केले. आर्थिक वर्षाअखेरीस करांच्‍या वसुलीवरही मोठा परिणाम झालेला आहे.

नागरीक व व्‍यवसायीकांप्रती सहानुभूती म्‍हणून शासनाने सर्व कर व भाडे वसुलीस माफी द्यावी अशी प्रकारचा ठराव २४ ऑगस्‍ट २०२० रोजी नगरपंचायतीच्‍या सर्वसाधारण सभेमध्‍ये करुन शासनाकडे पाठविण्‍यात आला आहे.

Advertisement

त्‍यामुळे या ठरावाचा तसेच व्‍यापारी, नागरीक, हॉटेल चालक यांच्‍या मागणीचा सहानुभूतीने विचार करुन,

शासनाने तातडीने करमाफी देण्‍याबाबत विचार करावा आणि मागणी शिष्‍टमंडळाने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्‍याकडे केली आहे. नगरपंचायतीच्‍या वतीने नगराध्‍यक्ष शिवाजी गोंदकर यांनी मागण्‍यांचे निवेदन मंत्र्यांना सादर केले.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

li