Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

मध्यप्रदेश सरकारने महाराष्ट्राच्या बसेसवर ३० एप्रिलपर्यंत बंदी वाढवली

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काही कडक निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे.

त्यानुसार मध्य प्रदेशमध्ये महाराष्ट्रातून येणाऱ्या अथवा महाराष्ट्रात मध्य प्रदेशमधून जाणाऱ्या बससेवेवरील बंदी मध्य प्रदेश सरकारने ३० एप्रिल पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

महाराष्ट्र बससेवेद्वारे सुरू असलेली प्रवासी वाहतूक या अगोदर २१ ते ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आली होती.

त्याचबरोबर भोपाळ, इंदौर, जबलपूर, बैतुल, छिंदवाडा, खरगोन आणि रतलाम येथील शाळा व महाविद्यालये १५ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारने घेतला आहे.

Advertisement

नागरिकांना मास्कचा वापर व सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सध्या तरी लॉकडाउनचा कुठलाही विचार नसल्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलेले आहे.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

li