Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

कोरोना लाटेचा तमाशा बंद करा; काँग्रेस नित्याचेच सरकारवर टीकास्त्र

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :-मागील लॉकडाउनमुळे जनता एवढी उद्धवस्त झाली आहे की, अद्यापपर्यंत स्थिरावलेली नाही. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या नावाखाली, जो तमाशा सुरू आहे तो बंद व्हायला हवा.

लॉकडाउनची कुठलीही आवश्यकता नाही. असे स्पष्ट मत काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी व्यक्त केले आहे. राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट पाहता पुन्हा एकदा लॉकडाउनचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

Advertisement

या पार्श्वभूमीवर मुंबईतील ओशिवरा पोलीस स्टेशनजवळ आज (गुरूवार) स्थानिक हॉटेल व्यावसायिकांनी लॉकडाउन आणि सरकारी निर्बंधांविरोधात निदर्शने केली. काँग्रेस नेते संजय निरूपम हे देखील या हॉटेल व्यावसायिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी यावेळी उपस्थित होते.

यावेळी निरूपम यांनी राज्य सरकारवर निशाणा साधल्याचे दिसून आले. निरूपम म्हणाले, लॉकडाउनची कुठलीही आवश्यकता नाही. काही सावधानता बाळगण्यासाठी हॉटेलवाले देखील तयार आहेत, मुंबईचे सर्वसामान्य नागरीक देखील तयार आहेत.

Advertisement

त्या दक्षतेची व्याख्या करा, त्या समजवा हॉटेल, रेस्टॉरंट व उर्वरीत व्यवसाय कसे चालतील? याची काळजी सरकारने करायला हवी.

कारण, जो लॉकडाउन मागच्यावेळी झाला, त्यानंतर मोठ्याप्रमाणात मुंबईहून स्थलांतरित मजुरांना मिळेल त्या मार्गाने व साधनाचा वापर करून परतावे लागले.

Advertisement

तर आता जर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाली तर लोकांना बेराजगार होऊन गावी जावे लागू शकते. ही परिस्थिती मुंबईसाठी व मुंबईच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगली ठरणार नसल्याचे निरूपम यांनी यांनी म्हटले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li